Marathi December 2011

Madhukar N. Gogate mngogate1932 at YAHOO.COM
Thu Dec 1 08:14:12 UTC 2011


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu


======================================= 
Marathi December 2011... Text in Devanagari, optional 
Roman (for practice) script (Jan Mar May Jul Sep Nov). 
Devanagari text (Feb Apr Jun, Aug Oct Dec). Circulate.  
Topic here Science thru Marathi by 2 Pune institutions. 
Visit (www.mngogate.com) Marathi M22,  English E03 E15. 
Links (www.mngogate.com/m22.pdf). If needed press Ctrl, 
Alt, while clicking pdf links (www.mngogate.com/e03.htm),  
and (www.mngogate.com/e15.htm)... End of English note. 
.......................................1 ..................................... 
46 वे मराठी विज्ञान अधिवेशन पुणे येथे 3-4-5 नोव्हें 2011 
साजरे झाले. (www.mavipamumbai.org) येथे माहिती पहा.  
संयोजक मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, टिळक स्मारक 
मंदिर, पुणे 411030 (mavipa.pune at gmail.com) व मविप 
मुंबई.. स्मरणिका > मराठीत विज्ञानप्रसारक पुण्यातील काही  
संस्था < या सदरात प्रस्तुत लेखकाच्या 2 लेखांचा सारांश पुढे.  
..................................... 2 .................................... 
महाराष्ट्र साहित्य  परिषद (www.masapapune.org) टिळक 
रस्ता, पुणे 411030.. त्रैमासिक पत्रिकेत अधूनमधून मराठी  
विज्ञान परिषद, परिभाषा यांवर लेख.. विज्ञानकथा विशेषांक. 
2001  पासून गो. रा. परांजपे (संस्थापक, सृष्टिज्ञान मासिक) 
यांच्या नावे ग्रंथलेखक पुरस्कार. सहसा वर्धापनदिनी 26 मे.. 
2001 ते 2011 अकरा लेखक - प्र. वि. सोवनी, निरंजन घाटे, 
बाळ  फोंडके, सुबोध  जावडेकर, पंडित विद्यासागर, अनंत पां. 
देशपांडे, माधुरी  शानभाग,  जयंत  नारळीकर, लक्ष्मण लोंढे, 
अरूण मांडे, दीपक शिकारपूर...... मराठी विज्ञान परिषदेशी 
संयुक्तपणे मसाप सभागृहात 28 फेब्रु राष्ट्रीय विज्ञान दिन, 
विज्ञानविषयांवर व्याख्याने (या सारांशात विषयनोंद नाही). 
2002 ते 2011 वक्ते - अ. पां. देशपांडे, प्रभाकर देवधर, दीप्ती 
देवबागकर,  प्रमोद  काळे, रंजन केळकर, दीपक शिकारपूर, 
द. रा. बापट,  सुलभा  कुलकर्णी, मिलिंद वाटवे,  वर्षा जोशी. 
2011 संयुक्तपणे वक्तानिवड, मसापने सभागृहही दिले. पण 
मसापच्या निवडणूक नियमांमुळे मसाप सहभागी नव्हती. 
..................................  3 ...................................... 
इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स पुणे सेंटर, जंगलीमहाराजरोड 
शिवाजीनगर, पुणे 411005, (www.engineerspune.org)    
सेंटर 1958 मध्ये सुरु. संस्थेचे मुख्य कार्यालय कोलकता 
येथे (देशात सुमारे 100 सेंटर > रिजनल, लोकल सेंटर हे 
फरक सारांशात गाळले). 2002 - 2011 या 10 वर्षात सात  
वेळा पुणे बेस्ट सेंटर (रु. 50000 पुरस्कार) विजेता.. अनेक 
निकष, एक म्हणजे > स्थानिक भाषेत केलेले लोकशिक्षण. 
जाने 02 पासून मासिक 1 भाषण सहसा तिसरा मंगळवार 
मराठी विज्ञान परिषदेसह संयुक्तपणे.  उदा. इमारतदुरुस्ती, 
रस्तेदुरुस्ती, प्रदूषणनियंत्रण, ऊर्जानिर्मिती नवे मार्ग, जल- 
शुद्धीकरण, वीटानिर्मिती, बांबूंचा उपयोग, शहराचे नियोजन, 
सांडपाणी व कचरा  व्यवस्थापन, धरणरचना, भूकंपप्रभाव, 
वीज बचत,  फेरोसिमेंट रचना,  आगनिवारण, पाऊसपाणी 
संकलन वगैरे अभियांत्रिकीचे प्रत्यक्ष विषय... अनुषंगिक 
विषय >  पेटंट कसे मिळते, माहितीचा अधिकार इत्यादी. 
सेंटर वार्तापत्रात कार्यक्रमाची वृत्ते.. काही वृत्तपत्रात आली. 
काही शाळांतून भाषणे छात्रांस अभियांत्रिकी परिचयासाठी. 

..................................  4 .................................. 
1 ते 38 विज्ञान संमेलन.. 39 पासून विज्ञान अधिवेशन.  
1966  मध्ये आजचे संगणक, मोबाईल, झेरॉक्स, ईमेल,  
दूरदर्शन नव्हते.. अर्ज केल्यानंतर  3 वर्षानी फोन मिळे. 
तरीही तेव्हा विश्वास होता की परिषद महाराष्ट्रात पसरेल,  
संमेलनप्रथा टिकेल, इतर विविध कार्ये होतील. स्टेजवर 
[पहिले मराठी विज्ञान संमेलन] फलक  होता.. वैज्ञानिक 
अध्यक्ष, प्रसिद्ध उद्‍घाटक,  परिसंवाद, विज्ञानप्रसारकांचा 
सन्मान, सहल, स्मरणिका आजच्याप्रमाणे तेव्हाही होते. 
स्पर्धाबक्षीसे तेव्हा  नव्हती.. काही वर्षे मी, पुढेही जिद्दीचे 
कार्यकर्ते आले, प्रगती झाली. 25 नोव्हे 2011 मुंबई येथे  
यशवंतराव चव्हाण पुरस्कार रु. 2 लाख  परिषदेस प्राप्त. 
www.mngogate.com/m17.pdf  आठवण संमेलन 3. 
25 नोव्हे 11 अपडेट www.mngogate.com/e06.htm     
=================================== 
  
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20111201/2488e34e/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list