Marathi Feb 2011

Madhukar N. Gogate mngogate1932 at YAHOO.COM
Tue Feb 1 08:37:10 UTC 2011


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

======================================
Marathi February 2011 in Devanagari..  Science Day. 
विज्ञानदिन - म. ना. गोगटे www.mngogate.com प्रसारार्थ.
- 1 -  
भारतात 1987 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो. पुढे
नोबेल  पुरस्कार मिळवणारा  निबंध 28 फेब्रुवारी 1928 रोजी 
नेचर या  प्रसिद्ध इंग्रजी विज्ञान मासिकास डॊ. रामन यानी
सादर केला. 28 फेब्रु रोजी ठिकठिकाणी विज्ञानावर कार्यक्रम 
केले जातात. सोयीनुसार आसपासचे दिवस निवडले तरीही
चालते.... उदा. सार्वजनिक रीतीने  दिवाळी साजरी करण्यास 
परदेशात सोयीनुसार नजिकचे शनिवार, रविवार निवडतात.
- 2 - 
विज्ञान हे  फक्त विज्ञानदिनी लक्षात ठेवावे असे नाही. सदा
सर्वदा,  कळत नकळत,   विज्ञानाची विविध साधने व सेवा 
आपण वापरत असतोच.. परंतु माणूस हा उत्सवप्रेमी आहे.
एखादा सण,  एखादी जन्मतिथी, एखादे संमेलन  समाजाची
शक्ती एकवटण्यास,  काही  प्रेरणा घेण्यास वा उपयुक्त कार्य
करण्यास चालना देतात.  त्या प्रकारे विज्ञानदिनाकडे पहावे.
- 3 -
विज्ञानाचा महिमा महान आहे. अतिसूक्ष्म कण व जंतु ते
अतिविराट आकाशगंगा व अवकाश यात त्याचा संचार आहे 
विज्ञानाने आपले जीवन खूप बदलले आहे,  व यापुढेही ते
वेगाने बदलेल. पण फक्त विज्ञानाच्या बलावर प्रकल्प उभा
रहात नाही.. सोबत व्यवस्थापन, वित्तपुरवठा, वहातूकयंत्रणा, 
वगैरे लागतात... कधीकधी विज्ञानाचा  दुरुपयोग होतो, जसे
फसवणूक  (उदा. बनावट  नोटा),  विनाश (उदा. बॉम्‍बस्फोट).
त्यांवर शासनाने उपाय करावा... जनतेनेही जागरूक रहावे. 
- 4 - 
विज्ञानाचा प्रभाव साहित्यावर पडला आहे.. अनेक प्रकारचे
दिवे, कॅमेरे, मुद्रणयंत्रे, स्कॅनर,  ध्वनीमुद्रक, व्याकरण चेकर,
संकेतस्थळे,  ईमेलसुविधा,  इत्यादीमुळे साहित्याची प्रगती
झाली.. पूर्ण मजकूराची भाषांतरयंत्रे आल्यावर क्रांती होईल.
- 5 -
(2002 पासून ही प्रथा) >   28 फेब्रुवारी  सायंकाळी  महाराष्ट्र 
साहित्य परिषद  व  मराठी विज्ञान परिषद   यांतर्फे जाहीर 
विज्ञानदिन भाषण.......  स्थल > महाराष्ट्र साहित्य परिषद,
टिळक रस्ता, पुणे.. तेथे फोन करावा.. पेपरात सूचना  येते.
www.mavipamumbai.org  > दर्शनी पान >  पुणे विभाग.
सर्व साईट वेळोवेळी अपडेट होते,. पाने कमीजास्ती होतात.
=====================================

-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20110201/e52c9998/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list