Marathi April 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Mon Apr 1 08:16:00 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu








































==============================
Marathi April 2013.................. Circulate.
nonperiodic Marathi mail monthly till june
2012 in Devanagari script, part in Roman.
See (www.mngogate.com) M22 E03 E15
for Marathi in Roman.... A sample at end.
Topic here. Marathi editor M.S. Kirloskar. 
............................. 1 ...........................
मुकुंदराव किर्लोस्कर ( जन्म 1921), पुरोगामी,
उत्साही अभ्यासक, खूप टिपणे व फोटो घेणारे,
माजी संपादक (किर्लोस्कर, स्त्री, मनोहर) यांचे
पुणे येथे 28 फेब्रु 2013 निधन... 5 मार्च पुणे
येथील शोकसभा त्रोटक वृतांत 6 मार्च केसरी
मध्ये, तो खाली साभार (प्रास्ताविक वगळून).
(कित्येक वृत्तपत्रात दीर्घ श्रद्धांजली लेख आले)

............................ 2 ..........................
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ही शोक
सभा पत्रकारभवन येथे आयोजित केली होती.
या वेळी केसरीचे सल्लागार संपादक एस. के.
कुलकर्णी,  ज्येष्ठ   पत्रकार  विजय कुवळेकर,
सुरेशचंद्र पाध्ये, म. ना. गोगटे,  प्रकाश भोंडे, 
सुधीर गाडगीळ ह. मो. मराठे, जयराम देसाई 
आणि इतर पत्रकार उपस्थित होते.
... 
"अभ्यासू आणि द्रष्टा  या  वैशिष्ट्यांबरोबरच
आपल्यातले   चांगले इतरांना देणारा आणि
इतरांच्या  चांगुलपणाला   प्रोत्साहन देणारा
संपादक "  अशा शब्दात  एस. के. कुलकर्णी 
यानी किर्लोस्कर यांचा गौरव केला.
...
पाध्ये म्हणाले, " अतिथी संपादक ही कल्पना
किर्लोस्करांनी  मांडली....  आणि कधीही  न 
लिहिणार्‍यांनाही त्यांनी लिहिते केले. यावेळी
स्वत:चे   संपादकपद   विसरून   अतिथींच्या
विचारांना   व्यासपीठ  मिळवून देण्याचे मोठे
काम त्यांनी केले. "
...
गोगटे म्हणाले, " काही  विषय हे  लोकांसमोर
मांडल्यानंतर त्यावर   चर्चा  घडवून आणावी
लागते,  अशा विषयांमध्ये संपादकांनी निर्णा-
यक   भूमिका  घ्यायची नसते.   यांसारख्या
गोष्टी मी किर्लोस्करांकडून  शिकलो."
...
कुवळेकर  म्हणाले, " काळाबरोबर चालणार्‍या
तरुणांबद्दल     त्यांना    प्रचंड  आस्था   होती.
"स्त्रीमुक्ती" हा शब्दही  कोणी  उच्चारत नव्हते
अशा   काळात   त्यांनी  या  विषयावर  चर्चा
घडवून आणल्या. त्यांची दूरदृष्टी प्रतित होते."
...
गाडगीळ म्हणाले "माझा  जनसंपर्काचा पाया
रोवण्यात   मुकुंदरावांचा  मोठा   वाटा होता." 
स्वहस्ताक्षरात त्यानी  लिहिलेली पत्रे आणि 
नोकरी  नसतानाच्या  काळात  केलेली मदत 
या  आठवणी त्यानी यावेळी सांगितल्या.
...
मराठे   म्हणाले, " भविष्यातला  वेध  घेणारे,
प्रत्येकाशी    माणुसकीचे   संबंध     ठेवणारे 
किर्लोस्कर जे मनात असेल ते बोलत आणि
तसे वागत. "
...
संघाचे पदाधिकारी गजेंद्र  बडे, मंगेश महाले
उपस्थित. जयराम देसाई यानी सूत्रसंचालन
केले. श्याम दौंडकर यांनी आभार मानले.
..........................  3 .........................
(म. ना. गोगटे यांचे कथन जरा विस्ताराने).
1997 मध्ये (वय 65) मी मुंबईहून पुण्यात
आलो. ही पत्रकारसभा आहे. मराठी विज्ञान
परिषद  पत्रिकेचा   मी  माजी संपादक आहे.
परिषद स्थापना 1966 मुंबईत. तेव्हापासून 
मी कार्यकर्ता आहे..... परिषदेचे सुमारे 70
विभाग. टिळक स्मारकमंदिरात पुणेविभाग
आहे..  सृष्टीज्ञान मासिकाचे गो. रा.परांजपे, 
मुकुंदराव किर्लोस्कर व अन्य कित्येकानी
स्थापनेस मदत केली. किर्लोस्कर मासिक
विज्ञाननिष्ठा पसरवत होते.. परिषदेने एका 
विज्ञानसंमेलनात या मासिकास गौरविले.
...
देवनागरी  लेखात  सर्व विज्ञानसाधनांतील
(उदा. थर्मामीटर)  जागतिक  अंक घ्यावेत.
त्या  अंकांना  भारतीय संविधान मान्यता.
देवनागरी एक, जागतिक नऊ < रूपसाम्य.
क का कि की कु .... यात कॅ, कॉ नाहीत.
कोशात कॅमेरा, कॉलर अशा विज्ञानशब्दांचे
स्थान ठरायला (अ‍ॅ ऑ)  स्वरमालेत घ्यावे.
यांवर  माझे  दोन लेख व वाचक- प्रतिसाद
मुकुंदरावानी अनुक्रमे किर्लोस्कर, मनोहर
यात (1960-64 दरम्यान) छापले. म्हणाले
" यांवर संपादकीय निर्णय नाही. साहित्य,
शिक्षण,  विज्ञान इ. क्षेत्रात चर्चा होणे इष्ट."
.........................  4 ..........................
vebsaait' pahaa mavipa, jaagatik anka.
** वेबसाईट पहा मविप, जागतिक अंक **
E09 -- (www.mngogate.com/e09.htm) 
M15 -- (www.mngogate.com/m15.pdf) 
अपयश संमेलन 2, 4, पण चर्चेचे पडसाद 
शासन, शिक्षणतज्ञांकडे गेले.. संमेलन 7 >
M17 - (www.mngogate.com/m17.pdf).
============================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20130401/3130a996/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list