Marathi December 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Sun Dec 1 08:12:41 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

================================
Marathi December 2013.. Circulate 
Email in Devanagari script..  Part 6
in Roman too. See M22, E03, E15, 
biodata in   [www.mngogate.com]
(www.mngogate.com/m22.pdf) 
Topic here....  Enlightening Poems
..................................  1 .....................................
हे विश्वचि माझे घर,
ऐसी जयाची मती स्थिर,
किंबहुना चराचर, आपण जाहला.
 
 -- ज्ञानेश्वर (1275-96) 
 
ज्ञानेश्वरी अध्याय 12  ओवी 213 योगीवर्णन.
जयाची = ज्याची. जाहला = झाला. 
चराचर = सर्व सजीव, निर्जीव.
ही निरहंकारी, चराचराशी  प्रेम व बंधुभाव कायम
असलेली स्थिती संपादण्यास काही साधना हवी.
आपण सामान्य प्रापंचिक लोक. आपण मच्छर,
झुरळे मारतो,  काहीजण मांसाहारसुद्धा करतात. 
वृक्षतोड नको.  केली तर अधिक लागवड करावी.
असो. मानवी बंधुभाव  हे ओवीचे मर्म समजूया.
.................................  2.....................................
वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी.
...
दिक्कालासहि अतीत झालो
उगमी विलयी अनंत उरलो.    
विसरूनि गेलो  अखिला भेदा
ऐकत असता दिड दा दिड दा.

 -- केशवसुत  (1866 - 1905)आहे की   उदास   कवीला  रस्त्यावर  हिंडताना
खिडकीतून  सतारीचे बोल  ( दिड दा,  दिड दा ) 
ऐकू येतात.  तो प्रथम चिडतो.   नंतर  हळूहळू 
तो शांत होऊ लागतो.  त्याचे मन उदात्त होते.
तो भेदभाव विसरतो...  कलाकृतीत  ही शक्ती.
 ................................. 3 .................................
खरा  तो एकचि धर्म
जगाला प्रेम अर्पावे.
...
जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे
जगाला प्रेम अर्पावे.
...
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे    
समस्ता बंधु मानावे
जगाला प्रेम अर्पावे. 

-- साने गुरुजी  (1899 - 1950)   

(खरा तो एकचि धर्म) या कवितेचा  भाग. कवी
थेट मानवतेचे आवाहन  वाचकाला करत आहे.
कुणालाही त्रास किंवा कटुशब्द नको. दीनदुबळे
देखील बंधुत्वास पात्र आहेत हा विचार उदात्त.  
भारताने   काही  बाबतीत  उत्तम प्रगती केली.
विविध  सज्जन उपयुक्त  कामे करत आहेत.
परंतु   देशात   भ्रष्टाचार  खूप फोफावला आहे.
चारित्र्य  खूप घसरले आहे.  जात,  धर्म, भाषा
यांबाबतीत   अनेक  गंभीर  तणाव  दिसतात.
देशाची  आर्थिक स्थिती बिकट व  विषमतेची.
याबाबतीत  सुधारणा  व्हायला हवी.... येथे ती
चर्चा नाही.  प्रापंचिकाने  आपले  काम शुद्ध व
विधायक  होण्यास  उदात्त  विचार स्मरावेत.
वर  तिन्ही कविता  उदात्तता बंधुभाव सूचक.
.. ............................... 5..................................
सुमारे  शंभर वर्षांपूर्वी  विज्ञानाच्या सोयीसाठी
मानवजातीस एकत्र आणणारा विशेष  उपक्रम
सुरू झाला.....  तो म्हणजे भाषा व लिपी एरवी
काहीही असो,  रसायनिक मूलद्रव्ये,  संयुगे व 
समीकरणे यांना  चिन्हानी   व्यक्त करण्यास
रोमन अक्षरे  (A-Z a-z) व 0123456789
हे जागतिक अंक (डावी  >  उजवी लेखनदिशा)
वापरले जातात.  उदा. C कार्बन,  Ca कॅल्शम. 
सुशिक्षितांचे  असे  विश्वबंधुत्व  उल्लेखनीय.
................................   6.................................
ज्ञानेश्वरी  (लेखन 1290)... गीतेवर निरुपण,
9023 ओवी. dnyaaneshvari (lekhan
1290) gitevar nirupan' , 9023 ovi. 
===============================(सतारीचे बोल)  कविताभाग.... अगोदर वर्णन.................................. 4 ...............................
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20131201/73a57040/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list