Marathi November 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Fri Nov 1 08:09:19 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

==========================
Marathi Nov 2013.........  Circulate.
Email in Devanagari script, part 1 
in Roman too. See  M22, E15, E03, 
biodata (http://www.mngogate.com/) 
M22(www.mngogate.com/m22.pdf).
Topic here.  Elphinstone & Marathi.
.......................... 1 ............................
आक्रमकांची   काही  स्मारक नावे   पुढे 
बदलतात.. aakramakaanchi   kaahi  
smaarak naave  pud'he badaltaat.
........................... 2 ...........................
1947  स्वातंत्र्य आले.. 1960  महाराष्ट्र
राज्य झाले.  वेळोवेळी, ठिकठिकाणची
काही ब्रिटीशांची  स्मारक नावे  बदलली.
Victoria  Jubilee Technical Institute 
यात  आरंभीचे 2 शब्द बदल (वीरमाता
जिजाबाई) केले.  (तेच लघुरूप VJTI ).  
Hornby Road   बदलले >  Dadabhai
Naoroji Road   दादाभाई नौरोजी रोड.
पण व्यवहारात DN Road असे संक्षेप.
वर मुंबईत उदाहरणे..  अन्यत्रही बदल
झाले.  काहींची  नावे अबाधित राहिली.
उदा.  एल्फिन्स्टन कॉलेज  (मुंबईतील
1835 स्थापना). Elphinstone  कोण ?
......................... 3 ...........................ए
एल्फिन्स्टन  (1779-1859)  भारतात 
ईस्ट इंडिया कंपनी सेवेत...  नेमणूकी
अन्यत्र....  नंतर  (1811-17) कंपनीचे
प्रतिनिधी   पेशवाईत,  पुणे...  (1818)
पेशवाई संपली...  (1819-27)  मुंबईचे
गव्हर्नर  > (मुंबई  व पेशवाई मुलूख).
कंपनीचे (गव्हर्नर-जनरल पद)  देकार
नाकारला.  (1829-1859) ब्रिटनमध्ये
......................... 4 .........................
कंपनीचे उत्पन्न  कसे  वाढेल  आणि
सर्वत्र  प्रशासन  कसे  नीट चालेल,  हे
गव्हर्नरचे  मुख्य काम होते. तरीही ते
प्रजाहितदक्ष   आणि  एक द्रष्टा ठरले.
संपूर्ण   इतिहास व   आकडेवारी  येथे
नाहीत... एल्फिन्स्टन यानी (जनतेचे
धर्म  न बदलता )  मराठी माध्यमात
आधुनिक  शिक्षणासाठी शाळा  चालू
केल्या... मराठी व्याकरण, शब्दकोश,
विविध पुस्तके (भाषांतरित व नवीन)
यांची  निर्मिती तज्ञांकडून करण्याला
आणि  मुद्रणकार्याला  चालना  दिली.
इंग्रजी  भाषेचेही  शिक्षण   दिले गेले.
एल्फिन्स्टन  यानी वरिष्ठांस  रिपोर्ट
पाठवले... एकाचा  मराठीत आशय >
...........................5 ..........................
आपल्या   शिक्षणाने शहाणी होणारी
प्रजा  त्यांस  देशाच्या  कारभारामध्ये
जास्त जास्त  अधिकार मिळवण्यास
धडपडू लागेल..... कदाचित 100  वर्षे
गेल्यानंतर एक दिवस येईल,  जेव्हा
आपणाला  सर्व  आवरून  स्वदेशाला
जावे लागेल...  तो दिवस इंग्लंडच्या
इतिहासात  परमभाग्यशाली   ठरेल.
 ......................... 6 ..........................
गव्हर्नर बदलले  तरीही एल्फिन्स्टन    
यांचेच  शिक्षण  धोरण  चालू   राहिले.
मोल्सवर्थ  यांचा   (मराठी >  इंग्रजी) 
(40000  शब्द)  कोश छापला.  तसेच,
कॅन्डी यांचे  मराठी  व्याकरण छापले.
त्यात   इंग्रजीची विरामचिन्हे घेतली.
सर्व   कामासाठी   स्थानिक पंडितांचे
सहाय्य मिळाले... मुद्रणयंत्रे मुंबईत 
होतीच..... मराठी टंकव्यवस्था  केली.
गरजेनुसार अधिक यंत्र, टंक योजना.
.......................... 7 .........................
1935 मेकॉलेचे  शिक्षण धोरण आले.
सर्वत्र   इंग्रजी  शिक्षणमाध्यम झाले.
परंतु   मराठी वृत्तपत्रे,  पुस्तके यात 
वाढ   होत गेली....  नंतरचा इतिहास
बाजूस ठेवू.... बहुभाषी भारतात सर्व
भाषांचा   आदर  करूया...  मातृभाषा
व  इंग्रजी   यांमध्ये   निपुण  होऊया.
जमल्यास अधिक भाषा शिकाव्यात.
नीट शिकलेली  नवी  भाषा > नवीन
ज्ञान, मैत्री  व  धन लाभण्याची संधी.
....................... टीप ......................
लोणावळा  48 वे  विज्ञान अधिवेशन
7-9 डिसेंबर 2013. मविप मुंबई येथे 
चौकशी  >  लेखक  वेबसाईट > E06

======================= 
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20131101/8009b33a/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list