Marathi Dec 2010
Madhukar N. Gogate
mngogate1932 at YAHOO.COM
Wed Dec 1 08:36:49 UTC 2010
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
=======================================
Marathi December 2010 in Devanagari on Condolence.
दुखवटा - म. ना. गोगटे (www.mngogate.com). प्रसार करा.
- 1 - प्रास्ताविक
www.mngogate.com/m03.pdf पान 2.. साहित्य संमेलन
विज्ञान संमेलनास प्रेरक झाले (पण दोघांचे कार्य, उद्देश वेगळे).
सुमारे 700 मतदार मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवडतात.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचे 125 मतदार कोट्यात मी
काही वर्षे होतो. ज्येष्ठांनी बाजूस होऊन नव्या अभ्यासूंना वाव
द्यावा.. 77 वयाला राजीनामा, 83 वे संमेलन मतदार नव्हतो.
राजीनामा = त्यागपत्र... मूळ अरबी भाषेत संमती (राजी) पत्र.
साहित्यसंमेलनात व इतरत्र होणारे दुखवटे, यांवर अल्पभाष्य.
- 2 - प्रथा उदय
सभेत दोन मिनीटे शांततेने उभे राहून स्मरण, श्रद्धांजली ही
मूळ ब्रिटीश प्रथा. त्यांच्या देशात, चर्चमध्ये देखील बसायला
आसने. त्यामुळे उठणे, बसणे, जागा न गमावणे, सहज होते.
भारतीय चटई बैठक गैरसोयीची.. संमेलनात खुर्च्या असतात.
- 3 - अनुल्लेख
(मागील संमेलन ते प्रस्तुत संमेलन), या कालखंडात निधन
झालेले साहित्यिक, व मान्यवर यांबद्दल दुखवटा ठराव होतो.
मार्च 2010 पुणे, 83 वे संमेलन समारोपसत्रात दुखवटा यादी
वाचण्यात आली.. नंतर सूचनेनुसार 2 मिनीटे उभ्याने शांतता.
( नानाजी देशमुख, सुनीता देशपांडे, मोहन वाघ) नावे यादीत
नव्हती ही नंतर पेपरात (रास्त) टीका आली. पुढील संमेलनात
वरील अनुल्लेख दुरुस्ती ? प्राथमिक यादी सूचनार्थ ठेवावी ?
- 4 - खेदकारक घटना
83 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तम झाले.
पण काही भाषणे अकारण जास्त वेळखाऊ झाली. तत्कालीन
मुख्यमंत्री यांनी अचानक भेटवेळ बदलली. कार्यक्रम संक्षिप्त
किंवा पुढेमागे करणे, असे काही प्रकार झाले.. रसिकांचा विरस
झाला. 3 दिवसात ( सर्व मंडप धरुन) 2000 मिनीटे कार्यक्रम
झाले.. संमेलनखर्च 1 कोटी रुपये. आकडे स्थूल आहेत, परंतु
खर्च प्रतिमिनीट रु 5000 मानूया.. (5000 ते 20000 बदलती
श्रोतेसंख्या) 20 मिनीटे लांबलेले भाषण > रु 1 लाख वाया !
येथे दुखवटा.नाही, पण खेद आहे.. तो वेळेचे मूल्य सुचवतो.
- 5 - दुखवटा सभा.
काही थोरांच्या निधनानंतर, यथावकाश दुखवटासभा होतात.
(मित्रानो, बंधुभगिनीनो) < अशी सुरुवात न करता, स्मरणार्थ
लहानमोठी भाषणे.. (टाळ्या वाजवायच्या नाहीत) हाही संकेत.
हल्ली काही सभांमध्ये (2 ऐवजी) 1 मिनीट, (उभ्याने ऐवजी)
बसून शांतता. (श्रोत्यांत दुर्बल ज्येष्ठांची संख्या खूप वाढली).
सभेऐवजी, काहीजण पत्राने वा मयतघरी वहीत शोक नोंदतात.
- 6 - कवायती दुखवटा
भूदल, नौदल, वायुदल, पोलीस यांच्यातील वीरमरण दुखवटा
त्यांच्या कवायतीप्रमाणे शिस्तबद्ध... बिगूलावर विशिष्ट धून.
विशिष्ट पद्धतीने धरलेली बंदूक. कधीकधी पुष्पचक्र समर्पण.
- 7 - श्रद्धांजली लेख
प्रसिद्ध व्यक्तींना श्रद्धांजली देणारे लेख, फोटो वगैरे वृत्तपत्रांकडे
आधीच तयार असतात... मग निधनवार्तेसह छापले जातात.
- 8 - राष्ट्रीय पातळी
इंग्लिश भाषेत दोन विरोधाभासी वाक्ये एकत्र येतात > The
King is dead. Long live the King. अर्थ > राजा मृत झाला.
(पण राष्ट्र जिवंत आहे, नवीन) राजा दीर्घायु होवो (अन्य अर्थ
असा > थोर व्यक्ती मृत, परंतु कार्य अमर).. निधनवृत्त आले
तरीपण Show must go on या तत्त्वाने काही नाटके होतात.
भाभा निधनानिमित्त (1966) अणुशक्ती कार्यालये बंद नव्हती.
भारताचे राष्ट्रपती वा प्रधानमंत्री निधन पावले की दूरदर्शनवर
शोकगीते, राष्ट्रध्वज अर्ध्यावर. हे ठीक आहे.. परंतु मरणदिनी
व अंत्यसंस्कारदिनी शासकीय कार्यालये, कित्येक उद्योग बंद
वा हरताळ.. कधीकधी दंगली ? देशाचे करोडो रुपये नुकसान.
=======================================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20101201/07fca25b/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list