Marathi August 2012

M Gogate mng1932 at YAHOO.COM
Sat Aug 11 21:33:18 UTC 2012


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu










====================================
Marathi August 2012  ....................... [Circulate]. 
Non-Periodical mail by author (no fixed month).

Monthly mails upto June 2012 -- M. N. Gogate.
(www.mngogate.com) > author info, E03,  E15.
(www.mngogate.com/m22.pdf)  > Usual script.
Topic here.. Discussion on few Marathi words.
...................................... 1 ..........................................
उगीचच धर्म आणू नये..  मराठी शिक्षणतक्ते पहा.
अ-अननस,  क-कमळ  ख-खटारा  ग-गणेश,  घ-घर
वगैरे सचित्र...  (ग-गणेश)  ऐवजी  (ग-गरुड)  घ्यावे.
सर्व धर्मीयांचे प्रेम व आदर मराठीला मिळावेत.
....................................... 2 .......................................

प्राईम मिनिस्टर =  पंतप्रधान (मराठी). हिंदीमधील
प्रधानमंत्री ठीक.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
अष्टप्रधानांचे मुख्य = (पंतप्रधान) हा इतिहास असा
वर्तमानात प्रवेशला. नेहरू पहिले पंतप्रधान.  त्यांस
(पं = पंडित) उपाधी होती.. (पं) मराठीत स्थिरावला.
1761  पानिपत येथे  लढाईत मराठा सेनेचा दारुण
पराभव. हल्ली निवडणुकीत एखादा पक्ष आपटला
तर  त्याचे  पानिपत  झाले,  अशी मराठीत इडियम.
पेशवाई कालात पंतप्रधान >  (पेशवा)  बदल झाला.
........................................ 3 .......................................
कधीकधी इंग्रजी शब्द  सोपे सभ्य वाटतात..  उदा.
पुणे,  मुंबई   येथे  कित्येक मराठी डॉक्टर व पेशंट
(लघवी, मूत्र) साठी (यूरिन) इंग्रजी शब्द वापरतात.
रक्तदाब  पेक्षा बीपी (= ब्लड प्रेशर)  हा शब्द सोपा.
परंतु काही मराठी शब्द  सोपे  > नत्र (नायट्रोजन),
जीविधा (बायोडायव्हर्सिटी) ( =  जैविक विविधता).
लहान दुकानदार  ग्राहकास (काका, मावशी, साहेब)

असे उल्लेखतात. (कमलताई, बाबूराव) वगैरे नावे
कधीकधी  माहीत नसतात. मग सुशिक्षित महिला
व पुरुष यांचे उल्लेख अनुक्रमे (मॅडम) आणि (सर).

मुंबईतले काही  रस्ते इंग्रजी  आद्याक्षरात परिचित. 
उदा. (एमजी रोड = महात्मा गांधी रस्ता).. इंग्रजी
पदवी अक्षरे देवनागरीत. उदा.  बीए,  एमबीबीएस.
....................................... 4 ......................................
खेळायचे पत्ते (कार्ड) >  (स्पेड व क्लब) या इंग्रजी
शब्दांचे अपभ्रंश (इस्पिक, किलवर ?) .... (डायमंड
व हार्ट)  यांचे अपभ्रंश झाले नाहीत ?   (चौकट व
बदाम)  मराठी  शब्द आकृतीनुसार  तयार झाले ?
प्लंबर कामगारानी वॉशर > वायसर  बदल केला.
........................................ 5 .......................................
काहीजण  (दूरध्वनी) वा ( दूरभाष)  असे लेटरहेडवर
नमूद करतात... (फोन) हा  शब्द चालेल.... संवादात
फोन नंबर काय,  असा उल्लेख होतो...  सोयीसाठी
326 असा छोटा नंबर घ्या.. (तीन  दोन  सहा) असे
न सांगता (थ्री टू सिक्स)  सांगणे ही मराठी प्रथा
दिसते.... भारत बहुभाषिक असल्याने  अशी सवय.
........................................ 6 ........................................
महाराष्ट्रात (वर्षात 1100)  दररोज  3 मराठी माध्यम
शाळा बंद पडत आहेत..  इंग्रजी माध्यमाकडे लोक
धावताहेत. झोपडपट्टी मुलेसुद्धा इंग्रजीत शिकतात.
युनिकोड येईपर्यंत मराठी मेल रोमनमध्ये असत.
भावी काही तंत्रज्ञानास त्रिस्तरी देवनागरी अपेशी ?
आज सुद्धा फोन (बुक, सीडी) इंग्रजी.. असे माना की
रोमन लिपी = मराठीसाठी आपत्कालीन व्यवस्था.
......................................  7 ........................................
गरज  भासली तर रोमन लिपी  वापरावी. भाषा व
लिपी मानवी साधने आहेत.   विचार करा.. garaj'
bhaasli  tar  roman  lipi  vaapraavi...  bhaashaa
va lipi maanavi saadhane aahet...vichaar karaa.
============== सावधान ==============
टीप mngogate1932[at]yahoo[dot] com पासवर्ड
अपहरण जून 2012 उत्तरार्धात < इंटरनेटवर गुन्हा.
===================================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20120811/f110e7f1/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list