Marathi February 2012
Madhukar N. Gogate
mngogate1932 at YAHOO.COM
Wed Feb 1 08:08:06 UTC 2012
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
=================================
Marathi February 2012 ............Text in Devanagari
and optional Roman script (Jan Mar May Jun Sep
Nov)....... Devanagari (Feb Apr Jun Aug Oct Dec).
Topic here... Notes on Marathi Vidnyan Parishad.
Circulate.. (www.mngogate.com) > M22, E03, E15.
A Marathi link (www.mngogate.com/m22.pdf) &
two English links (www.mngogate.com/e03.htm)
(www.mngogate.com/e15.htm). English note end.
......................................................................................
मराठी विज्ञान परिषद .. काही नोंदी (1 फेब्रु 2012)
......................................... 1 .........................................
मराठी विज्ञान परिषद मुंबईत ( एप्रिल 1966) सुरू
झाली. पहिल्या 3 वर्षात जडणघडण करणारे मुख्य
असे / रा. वि. साठे / म. ना. गोगटे / गो.रा. परांजपे /
/ श्री. शां. आजगावकर / चिं. श्री. कर्वे / प. म. बर्वे /
काहीजण भलतीच नावे सांगतात यासाठी ही नोंद.
.......................... 2 अल्प परिचय..............................
साठे मुंबईविद्यापीठ माजी कुलगुरु.. प्रसिद्ध डॉक्टर.
ते अध्यक्ष म्हणजे (संस्था उत्तम) समाजास खात्री.
गोगटे इमारत अभियंता.. विविध कार्यक्रम, शाखा-
निर्मिती, पत्रिकासंपादक, भावी भवनासाठी खटपट.
परांजपे सृष्टिज्ञान मासिक जनक. परिभाषा प्रमाण
व्हावी, त्यांचे भाषण (1968).. शिक्षणमंत्री प्रभावित.
(सर्व विद्यापीठे, मविप) यांचे विषयवार प्रतिनिधी,
व भाषासंचालक यांतर्फे परिभाषा बैठकींना आरंभ.
आजगावकर मधुमेहतज्ञ.. पूर्ण कार्यकारिणी 3 वर्षे
असल्यास पुढे पॅनेलयुद्धे शक्य... त्यांच्या सूचनेने
वार्षिक 33 % जागांची निवडणूक असे घटनानियम.
कर्वे खालसा कॉलेज प्राचार्य... दाक्षिणात्य (माटुंगा
भाग) अन्यभाषिक विज्ञानप्रसारक शोधले. मविप
सह काही संयुक्त कार्यक्रम (इंग्रजीतून) सुरू झाले.
बर्वे विल्सन कॉलेज प्राध्यापक.. खूप वक्ते, लेखक
यांना मराठी अनुवाद (श्रेय न घेता) दिले.. तज्ञांचा
सन्मान जपला. त्याखेरीज पत्रिका ज्येष्ठ संपादक
......................................... 3 ........................................
46 वे विज्ञान अधिवेशन (1 - 38 संमेलन हे नाव)
नोव्हें 2011 टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे झाले.
एक वृत्तांत मराठी विज्ञान परिषद पत्रिका (मविप
मुंबई मुख्यालय मुखपत्र) डिसें 2011 अंकात आहे.
(किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड) , (स्टेट बॅंक
ऑफ इंडिया) हे दोन प्रायोजक, ही नोंद हवी होती.
मविप पुणे विभागाने चांगले अधिवेशन घडवले.
......................................... 4 .......................................
(www.mavipamumbai.org) यामध्ये पत्रिका पहा.
कित्येक अंकातून उत्तम विज्ञानप्रसार केला आहे.
पण डिसेंबर 11 अंकाअखेर फुलबाज्या लेख पहा.
त्यात डावा स्तंभ अंतिम 2 नोंदी , उजवा स्तंभ
प्रथम 5 नोंदी, यांमध्ये 46 वे अधिवेशन संबंधित
संस्था, वक्ते, कार्य यांवर तथ्यहीन व अप्रस्तुत
टीका आहे.. टिळक स्मारक मंदिर, पुणे विद्यार्थी
गृह यांची नावे घेऊन नालस्ती केली आहे. या
दोन्ही संस्था मविप पुणे विभागास खूप मदत
करतात... भारनियमनामुळे कित्येक थिएटरांना
जनरेटर असूनही, कधीकधी वातानुकूलन कमी
करावे लागते.... दोन्ही ठिकाणी स्वच्छता उत्तम.
वसतिगृहातील 5 टक्के अतिथी अन्यत्र गेले.
नातेवाईकानी बोलावले, वगैरे कारणे संभवनीय.
...................................... 5 .......................................
नावे न घेता व्यक्तीगतही नालस्ती आहे.. पण
वृत्तांतावरून ती नावे समजू शकतात.. विविध
तज्ञ निमंत्रित होते. भाषण (छान झाले) (झाले)
हे वृत्त ठीक. (वाईट झाले) नोंद मुखपत्रात नको.
परिसंवादतज्ञ समयाची वाटणी सोयीने घेतात.
थोडेसे वेळापत्रक बदलू शकते... इतर टीकेचेही
खुलासे करता येतील. मूळात लक्षात ठेवावे की
परिषद = लोकसंग्रह... सौजन्य हे त्याचे पथ्य.
....................................... 6 .....................................
लेखक हे मित्र व कार्यकर्ते.... परंतु कर्तव्य मोठे.
तो मजकूर छापण्याची गरज अजिबात नव्हती.
तो मजकूर रद्दबातल केला आहे, क्षमा करावी,
असे प्रकटन मविपने मार्च 2012 अंकात करावे.
सोबत हा माझा पूर्ण लेख असावा. एप्रिल-मार्च
वर्षातील पत्रिकासंच अनेक ग्रंथालयात रहातील.
वाचकांची नाराजी भावी इतिहासकारांस दिसावी.
.
-- म. ना. गोगटे (www.mngogate.com) > M18.
==================================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20120201/c4d233a0/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list