Marathi October 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Tue Oct 1 08:24:05 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

==========================
Marathi October  2013.       Circulate.
Email in Devanagari script, part 1 in
Roman too. Visit  M22, E15, E03, 
biodata (http://www.mngogate.com/)
M22 (www.mngogate.com/m22.pdf).
Topic here. Language Dominance.
....................... 1 .......................
इंग्रजी व हिंदी भाषा मराठीवर आक्रमण
करतात ? ingraji va hindi bhaashaa 
maraat'hivar  aakraman'  kartaat ?
......................  2 ........................
भारतात  सर्व  भाषांचा  सन्मान ठेवला
पाहिजे.  परंतु,  संविधानीय तरतूदींमुळे
इंग्रजी व  हिंदी यांचा जास्त वापर होतो.
उदा. (टपाल स्टॅम्प), (नाणी), (पासपोर्ट)
यात फक्त इंग्रजी, हिंदी शब्द असतात.
उच्च न्यायालयात फक्त इंग्रजीत कामे.
रस्त्यावरील   वाहनाचा  अपघात झाला
तर  मालकाची   माहिती नंबरप्लेटमुळे
मिळते.  त्यात (A-Z) (0-9) हीच चिन्हे
हवीत,  असा बहुलिपी भारतात कायदा.
(०१२३४५६७८९)  देवनागरी अंक आहेत.
थर्मामीटर, फोन तबकडी,  कॅल्क्युलेटर,
खेळपत्ते, मापटेप यात 0123456789.
त्यांना (जागतिक अंक) असे संबोधावे.
...................... 3 .......................
मराठी  शहरी  सुशिक्षित पुरुष शरीराची
सजावट   करताना  खूपच इंग्रजी शब्द
वापरतो.  पावडर, सेंट,  शर्ट, कोट, टाय,
वॉच, गॉगल, कॉलर, पॅन्ट, बू्ट पॉलिश,
बकल,  बेल्ट,  बटन,  टूथपेस्ट, टूथब्रश,
रेझर,  ब्लेड,  शेव्हर,  स्वेटर,  मफलर,
पेन, नेलकटर, शॉवर, टॉवेल (इत्यादि).
मराठी लोक खुशीने  ते शब्द वापरतात.
...................... 4 .....................
समान  लिपी,  कित्येक समान शब्द
यांमुळे हिंदी  भाषा मराठीस जवळची.
इंग्रजीमुळे  देशाची  एकता, आधुनिक
ज्ञानाशी, जगाशी संबंध यांस मदतच
होते. दोन्ही भाषांबद्दल आदर असावा.
(पुस्तक  प्रकाशन   समारंभ  साजरा)
असे  नेहेमीचे  मराठी  शब्द असतात.
(पुस्तक विमोचन  समारंभ  संपन्न)
असे लेखन =  हिंदीचे  आक्रमण ? ?
नीट विचार करावा. इंग्रजी आणि हिंदी
भाषांचे मराठीवर  आक्रमण होत नाही.
मराठी  भाषा त्यांचे अनुकरण करते !
अनुकरण कित्येकदा होत नाही.. उदा.
शिक्षा =  Education (हिंदी)... परंतु
= Punishment  (मराठी).. मराठीत
काही मूळ हिंदी शब्द. उदा. धन्यवाद.
मध्ययुगी  सुलतानी राजवटीत खूप  
फारसी / अरबी शब्द आले.. (काहीत
बदल) साहेब,  खूप, हुशार, खबरदार,
तारीख, अंदाज, हरकत, सफर, वगैरे.
त्यामुळे  मराठी संपन्न झाली आहे.
त्यांचा समावेश  मराठी शब्दकोशात.
कित्येक  इंग्रजी  शब्द मराठीत, पण
शब्दकोशात  त्यातले  थोडे  असतात.
मराठीने इंग्रजी  विरामचिन्हे घेतली.
.....................  5 .....................
एका भाषेतून अन्य भाषेत जाताना
शब्दार्थ बदलू शकेल.  उदाहरणे पहा.
(फारसी / अरबी)   >  राजी = तयार.
म्रराठीमध्ये  राजीनामा =  त्यागपत्र.
कटु ( =  तिखट ), तिक्त (= कडू ).
संस्कृत  भाषेतले शब्दार्थ (कंसात).
इराण , इराक =  मध्यपूर्व (युरोपीय
संदर्भाने) =  मध्यपश्चिम (भारतीय
संदर्भाने). तरीपण मध्यपूर्व उल्लेख 
हे सोयीचे लेबल आहे.  उदा. (अरबी
समुद्र). त्याचे  अरब मालक नाहीत.
9/11 = 9 नोव्हेंबर < भारत, युरोप.
9/11 =  सप्टेंबर 11  < अमेरिकेत.
..................... 6 ....................
कधीकधी शब्दरचना विरुद्ध अर्थाची.
शहाणा आहेस !  गर्भितार्थ > मूर्ख.
सूर्य फिरतो < भास. पृथ्वी फिरते.
वायरमधील  A ते B वीजप्रवाह =
निगेटिव इलेक्ट्रॉन प्रवाह B ते A.
डावा कान = आरशात उजवा कान.
रस्ता A कडे जातो. (रस्ता अचल).
पायात बूट ( = बूटात पाय)  घाल.
अशा रचना = (षाभा)  संबोधावे ?
======================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20131001/aa10ace6/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list