Marathi April 2014
Madhukar Gogate
mng1932 at YAHOO.COM
Wed Apr 2 11:39:16 UTC 2014
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
=========================
Marathi April 2014............. (Circulate).
in Devanagari script..... Part 1 in Roman
too..... .Visit M22, E03, E15, biodata on
Website [www.mngogate.com]
link M22 (www.mngogate.com/m22.pdf)
..................................1 .............................
कठीण समय येता कोण
कामास येतो ?
(- एक
कविवचन) kat'hin'a
samaya yetaa
kon' kaamaas yeto ? (- ek kavivachan).
................................ 2 .............................
मे 2014 मध्ये नवी लोकसभा निर्माण होईल.
सार्वत्रिक निवडणूक (जनरल इलेक्शन) ही
एक मोठी घटना असते. फक्त दोन पक्ष उभे
असले तर लोकमानस नीट समजते. विविध
पक्ष उभे असले तर मतविभागणी होते आणि
विजयी उमेदवार किमान 50% मतदात्यांना
मान्य आहे, असे होईलच असे नसते. उदा. 4
उमेदवार असले व त्यांना 30%, 27% , 23%,
20% मते मिळाली तरी पहिला विजयी होतो,
खरे तर, 70% मतदात्यांना तो नको असतो.
निवडणूक पद्धत सुधारणेवर येथे चर्चा नाही.
कठीण समय आल्यास विरोधी पक्ष एकत्रित
आघाडी निर्माण करतात. ऐक्य ही फार मोठी
शक्ती असते... 1956-59 कालात सत्ताधारी
पक्ष व संयुक्त महाराष्ट्र समिती ही आघाडी
या दरम्यान लढा झाला. 1977 मध्ये जनता
पक्ष (जणु काही एक आघाडी ) व सत्ताधारी
पक्ष यात लढा झाला. राजकीय संकट संपले.
वर "लढा" हा शब्द लोकशाही (लष्करी नाही).
................................ 3 ............................
लोकशाही नीट चालण्यास लोकभाषेत कामे
इष्ट यास्तव भाषिक राज्ये करण्यात आली.
1960 मध्ये [महाराष्ट्र राज्य] स्थापन झाले.
त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती यांस सहाय्य.
कोणत्याही समाजाला स्वभाषेविषयी काही
आपुलकी वाटते कारण भाषा लोकांस जोडते.
............................... 4............................
माझा मराठाचि बोलु कौतुके
परि अमृतातेही पैजासी जिंके
ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन < (ज्ञानेश्वरी).
अध्याय 6 ओवी 14. रचना काल सन 1290.
वरील रचनेमध्ये [मराठा] = मराठी भाषा.
पण [मराठा] शब्दाचे 2 मुख्य अर्थ आहेत.
[एका ज्ञातीचे नाव][विशाल अर्थ महाराष्ट्र].
............................... 5 ...........................
ब्रिटिश राजवट कालात मद्रास-मिरज-पुणे
रेल्वे होती तिचे नाव MSM = मद्रास सदर्न
मराठा होते, यात [मराठा = महाराष्ट्र] आहे.
दक्षिण रेल्वे, मध्य रेल्वे वगैरे नंतरची नावे.
[महाराष्ट्र] अर्थ अभिप्रेत [मराठा] हा शब्द
काही वृत्तपत्रे व चेंबर ऑफ कॉमर्स नावात.
जनगणमन राष्ट्रगीतात गेयता येण्यास
[महाराष्ट्र] ऐवजी [मराठा] शब्द ..[बंगाल]
ऐवजी शब्द [वंग].... पुढे जुळणारा [तरंग].
[भारत] साठी [हिंदुस्तान] हा पर्याय आहे.
त्यावरूनच [हिंदुस्तानी] भाषा, [जय हिंद]
हा स्वतंत्रता मंत्र, तसेच हिंदुस्तान लिव्हर,
हिंदुस्तान कंस्ट्रक्शन वगैरे कंपनींची नावे.
.............................. 6..............................
मातृभाषेत आकलन व प्रकटन सहज होते.
मराठी भाषेचा विकास व वापर वाढत जावा.
पण भारत हे बहुभाषी, बहुलिपी राष्ट्र आहे.
एक संपर्कभाषा आवश्यक. भारतात इंग्रजी
भाषा होतीच, ती ग्लोबल संपर्कभाषा झाली.
जागतिक पातळीवर काही व्यापार उद्योग
करायचे झाल्यास संपर्क भाषा लागणारच.
इंग्रजीतील ज्ञानविज्ञान वेगाने वाढत आहे.
इंग्रजीमुळे जगभर उपयुक्त संपर्क होतात.
इंग्रजी भाषेत शक्य तितके निपुण व्हावे.
============================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20140402/85d1e8fc/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list