Marathi Vowels Oct 2010

Madhukar N. Gogate mngogate1932 at YAHOO.COM
Fri Oct 1 10:31:41 UTC 2010


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu










=========================================
Marathi Vowels Oct 2010 (in Marathi..... in Devanagari) 
मराठी स्वर - म. ना. गोगटे (www.mngogate.com) . प्रसारार्थ.
लिंक > (www.mngogate.com/m22.pdf) वेबसाईट लेख M22
(www.mngogate.com/m20.pdf) लेख M20 सूचना 5, 7, 11.
-- 1 -- स्वरमाला
मराठीत पुढील स्वरमाला वापरतात... (अ आ इ ई उ ऊ ऋ
ए ऐ ओ औ)... महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 6  
नोव्हें 2009 च्या अध्यादेशाने. (अ आ इ ई उ ऊ ऋ ए अ‍ॅ ऐ
ओ ऑ औ) स्वरमाला प्रमाण झाली.. व्यंजनेही ठरवली. (पण
येथे  चर्चा नाही). शासनाने काही तज्ञांचा सल्ला घेतला असेल. 
सामाजिक प्रथा एकदम बदलत नाहीत.. तरीही प्रयत्न करावेत.
शासनाची स्वरमाला ठीक दिसते.. पण पहा  ऋ, ऐ, औ, इ, उ.
- 2 - ऋ
मराठीत ऋ स्वर नाही. थोड्या शब्दात त्याचा उपयोग. उच्चार
बहुधा (रू), क्वचित (री). उदाहरणे - (गृह > ग्रू ) (तृतीय > त्री). 
- 3 -  अ‍ॅ, ऑ, ऐ, औ
कित्येक इंग्रजी शब्द मराठीत आले व येतील. इंग्रजी अ‍ॅ, ऑ 
स्वरांचे काय ? bat doctor = ब्याट डाक्टर, office bottle =
हापीस बाटली,  असे पूर्वी उल्लेख झाले.. पुढे सुधारणा झाली. 
अ, आ यांवर चंद्र असलेली चिन्हे आली. सुमारे 100 वर्षे बॅट,
डॉक्टर असे कैक शब्द भाषेत असले तरी अ‍ॅ ऑ शासनमान्य
नव्हते. (क का कि..) मालिकेत कॅ कॉ नव्हते. कोशकर्ते (बॅट)
वगैरे शब्द गाळत, वा मर्जीनुसार त्यांना  कोशस्थान  मिळाले.
पूर्वी विद्वान ऐवजी विद्वान् असे  ध्वनीनुसार हलन्तयुक्त शब्द. 
तसे प्रथम बॅट्  डॉक्टर् असे लेखन... पण नंतर हलन्त गेले. 
कैलास उच्चार (मराठी कईलास, हिंदी कॅलास) मराठी लखनौ
हिंदीत नाव (लखनऊ).... (ऐ औ) हेच मूळात (अ‍ॅ ऑ) होते ?
- 4 - इ, उ  
सर्व स्वरांचे उच्चार ह्रस्व, दीर्घ होतात... (सामान) पहिला आ
ह्रस्व, दुसरा आ दीर्घ..  मराठी लेखनात फक्त  (इ उ) ह्रस्वदीर्घ. 
सुत, सूत, दिन, दीन असे थोडे शब्द वगळल्यास ह्रस्वदीर्घाने
अर्थ बदलत नाही.. व्याकरण सोपे  करण्यास सर्व स्वर दीर्घ
लिहिणे पर्यायी मान्य करावे.. कर = tax, hand, do हे अर्थ 
संदर्भाने. तसे (दीन सूत) यांसाठी करावे. (अग्नि) शिकायला, 
लेखनास कठीण. विचित्र वेलांटी. ध्वनीक्रम agni, देवनागरी
चिन्हक्रम aign. (अग्नी) शब्द सोपा. इंग्रजीत इ, ई = i, ee.
हिंदी  hindi (hindee नाही). मोडी लिपीत ह्रस्वदीर्घभेद नाही. 
- 5 - स्वरचिन्हाची टक्कर
(च ज झ) चे दुहेरी उच्चार.. त्याखाली नुक्ता (टिंब) दिल्याने
स्पष्टता. त्यात ह्रस्व उकार गैरसोयीचा.. उदा. जुगार + नुक्ता.
अशी चिन्ह टक्कर.. truman > ट्र + अक्षराखाली (उ-चिन्ह),
organic शब्दात र्ग + चंद्र... उपाय (ट् रुमन) (ऑर् गॅनिक).
.............................................................................
अ + चंद्र ईमेल अडचण ? नीट लेख > अ‍ॅ. कॉपी-पेस्ट-सेव्ह
अध्यादेश माहिती www.marathiabhyasparishad.com 
======================================

-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20101001/0ac75eaa/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list