Marathi February 2014

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Sat Feb 1 08:43:11 UTC 2014


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

=================================
Marathi February 2014............  Circulate        
Email in Devanagari script........ Part 1 in
Roman too. Visit M22, E03, E15, biodata
on website [www.mngogate.com] 
M22 link > (www.mngogate.com/m22.pdf)
Topic here............ Importance of English 
............................ 1 ..................................
मराठी नीट शिकलीच पाहिजे.  पण इंग्रजी भाषा
सुद्धा जमेल तितकी शिकावी...   maraat'hi  nit'
shiklich' paahije... pan'  ingraji bhaashaa
suddhaa  j'amel  titki shikaavi. (पहा M22).
..............................2.................................
आपण  मराठी भाषा देवनागरी लिपीत व इंग्रजी 
भाषा रोमन लिपीत  लिहितो वाचतो. गरजेनुसार
लिपीची अदलाबदल होऊ शकते. ती होत असते.  
अमेरिका (+ कॅनडा), पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया
येथे मराठीभाषकांची सांस्कृतिक अधिवेशने होत
असतात... संगणकावर देवनागरी  छपाई करणे
हे तंत्रज्ञान विकसित झाले.  पण मजकुर ईमेल
करण्यात अडचणी होत्या.  फॉंन्ट ठिकठिकाणी 
समान प्रणालीचे नव्हते. निरुपयाने इंग्रजीत वा
रोमन  लिपीतील मराठीत ईमेल पाठवली जाई.
त्यात एकवाक्यता नव्हती.  उदा.  आ = aa, a',
A असे विविध संकेत.  अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र
वार्ता  विशेषांकात, व  (दर वर्षाआड आयोजित)
एका  अधिवेशन  स्मरणिकेत  माझे  सूचनालेख
आले. (संकलित सारांश M22).  नंतर युनिकोड
आले, व समस्या गेल्या.... तरीपण सॉफ्टवेअर
प्रसार व  प्रशिक्षण यात समय  गेला.. स्थूलपणे
2010 पासून  देवनागरी विपुल ईमेल्स जातात.
पण email-id  रोमन लिपीत.  उदा [a.b at cd].
............................. 3 ................................

पोलीस,  डॉक्टर, गॅस,  सिग्नल, रबर, पेपर असे
कित्येक इंग्रजी शब्द  देवनागरीत मराठीत आले.
अंत्य (अ) अनुच्चारित. उदा. (राम) > राम्‌ असा
उच्चार. तसेच देवनागरीत इंग्रजी. (गॅस) > गॅस्‌.
बरेचदा मराठी  बिल, पावती रोमन लिपीत. उदा.
Dudhi Halva .. Rs..... ग्राहक हा राजा !  तो
कधीकधी  देवनागरी न समजणारा असू शकतो.
किंवा दुकानात इंग्रजीचे मुद्रणयंत्र उपलब्ध.  या
बाबतीत व  सीडीवर  गीत शीर्षक देताना प्रत्येक
शब्दाचे प्रथमाक्षर कॅपिटल. a = अ आ i = इ ई
u = उ  ऊ  t  d n  l =  त्‌  द् ‌न्‌ ल्‌  (किंवा)  ट्‌ ड्‌
ण्‌ ळ्‌‌  < हे  संकेत.  उदा. अभंग > (ताटी उघडा,
Tati Ughada < शीर्षक) = taat'i  ughad'aa.
असे रोमन लिपीत ठीक ध्वनीलेखन. ह्रस्वदीर्घ
आग्रह असलाच तर taat'ee लिहावे.. लेखनात
स्वर, व्यंजने व काही चित्रचिन्हे असतात. उदा.
(+) चिन्हाचे  वाचन (अधिक), इंग्रजीत (प्लस).
(I V X) असे रोमन अंक नकोत.  (012...789)
हे जागतिक अंक (देवनागरीत देखील) घ्यावेत.
Diacritical marks (a वर आडवी रेघ, n खाली
टिंब वगैरे) असलेली चिन्हे नकोत.  ती तरतूद
अनेकांकडे नसते. चालू इंग्रजीयंत्रेच वापरावीत.
............................  4.... ..........................
वर जे  संकेत  दिले आहेत,  ते आपण  आजही
आपले (पहिले, मधले, आड)  नाव,  रस्ता नाव,
गावाचे नाव वगैरे इंग्रजीत मांडताना वापरतो.
शब्दाचे प्रथमाक्षर कॅपिटल. a =  अ, आ वगैरे
परंतु नीटपणे रोमन लिपीत मराठी लिहिताना
M22 सोयीचे.. कॅपिटलचा विवक्षित वापर पहा.
(ह्रस्वदीर्घ) भेद (शष) भेद, (‍ऋ), काढणे शक्य.
सत्य सरकार (उच्चार सत्त्य सर्कार्‌ ) आहेत.
sattya, sarkaar लिहावे. M22 लेखात अशा
काही सूचना विचारार्थ.. (चूक प्रथा बदलावी).
भारताबाहेर मराठी कुटुंबातील लहान मुलांना
व काही विदेशींना  मराठीचा परिचय देण्यास
रोमन लिपी सोयीची. मराठीतील काही म्हणी 
(इंग्रजी, रोमन लिपी) चा सेतु वापरून जगभर
(अर्थ उच्चार सहित) जाऊ शकतील... विदेशी
मित्रास सांगा की  मराठी ऐकण्यास गुगलवर
लिहा > Marathi Proverbs in Roman Script.
माझी वेबसाईट लेख E03 > मुद्दा 9 सापडेल.
याहून व्यापक व प्रभावी सेतु बनवता येतील.
.............................. 5 ............................
जर्मनी, जपान, रशिया प्रमाणे भारत एकभाषी
एकलिपी देश नाही.. शिवाय इतिहास कारणे.
भारतात इंग्रजीचे प्रस्थ आहे हे नाकारू नये.
भारतात  खूप उच्च  व्यवसाय, उच्च संशोधन, 
उच्च शिक्षण इंग्रजीत. कित्येक देशात इंग्रजी
पहिली किंवा दुसरी भाषा शिकवली जाते.  सर्व
सुशिक्षित जगभर  2  भाषा जाणणारे होतील.
आंतरराष्ट्रीय विज्ञानसंमेलनांचे काम इंग्रजीत.
जगभर कित्येक  विद्यापीठांचे  वेबसाईट दोन
भाषांमध्ये  असतात > स्थानिक आणि इंग्रजी.
कितीतरी उत्तम साहित्य इंग्रजी  भाषेत  आहे. 
रोमन  लिपी  एकस्तरी.. त्यामुळे शब्दकोश व
फोन डिरेक्टरीला  सोयीची.. माहितीचा स्फोट
इंटरनेटवर आहे. माहितीशोधाला रोमन सोपी.
बरेच  बिल्डर-- ग्राहक करार  इंग्रजीत होतात.
आर्किटेक्टांची  बहुतेक रेखाटने इंग्रजीमध्येच.
पॅथॉलॉजी व  कित्येक मेडिकल रिपोर्ट इंग्रजी.
............................. 6 ..........................
काही विज्ञान इंग्रजीतून घ्यावे..  अनुवादाची
वाट पाहू नये..... विज्ञानप्रगती वेगवान आहे.
देवनागरीत शिरोरेषेमुळे शब्द स्पष्ट दिसतो.
मराठीत आकलन लवकर होते.  तरीही दोन
वा तीन भाषा शिकाव्या लागतातच.. इंग्रजी
भाषा पूर्णपणे (निदान कामचलाऊ)  शिकावी.
==============================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20140201/26845a14/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list