Marathi June 2011

Madhukar N. Gogate mngogate1932 at YAHOO.COM
Wed Jun 1 08:03:13 UTC 2011


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu










=========================================
Marathi June 2011 .... Text in usual Devanagari, optional
Roman (for practice) scripts in Jan Mar May Jul Sep Nov.
Devanagari text in Feb Apr, Jun, Aug, Oct Dec. Circulate. 
Topic below -- Few features of Hindi & Marathi languages.
See (www.mngogate.com) Marathi M22 English E03 E15.
links (www.mngogate.com/m22.pdf). If needed press Ctrl
Alt while clicking pdf link. (www.mngogate.com/e03.htm).  
and (www.mngogate.com/e15.htm).. End of English note.
....................................... 1 .........................................
भारतात खूप भाषा व खूप लिप्या आहेत..... हिंदी व मराठी या
भाषांमध्ये कित्येक समान शब्द व जवळजवळ समान देवनागरी
लिपी आहे. कित्येक मराठीभाषक थोडीशी (काहीजण उत्तम) हिंदी
बोलतात, जाणतात. त्यातून मराठीचा एक तोटा होतो.  दीर्घकाल
महाराष्ट्रात राहिलेले, मूळचे  अन्यभाषक हे नीट मराठी बोलतात,
व समरस झाले आहेत. पण हल्लीचे कित्येक हिंदीभाषक (किंवा
पुरेशी हिंदी येणारे अन्यभाषक) मराठी बोलत नाहीत. पण (उदा)
कर्नाटकात, बंगालमध्ये, आंध्रमध्ये, त्यांना सर्वत्र, केवळ तेथील
लिपी दिसते. त्यांना ती लिपी व स्थानिक भाषा शिकावी लागते. 
........................................ 2 .....................................

जगभर भाषा अस्मितेची वाहक आहे.. वेल्स व स्कॉटलंड येथील
स्थानिक भाषांना मान देणे ब्रिटिशांना भाग पडले... पाकिस्तान
फुटला (1971)... एक कारण तेथे बंगाली भाषेचा अनादर झाला. 
मराठी प्रगल्भ भाषा आहे.... महाराष्ट्रात अन्य भाषांतून शिक्षण,
मनोरंजन वगैरेंना वाव द्यावा.... पण मुख्य मान मराठीला हवा.
...................................... 3 .......................................

शिक्षा education (हिंदी), punishment (मराठी). education =
शिक्षण (मराठी).. हिंदीत मराठी (ळ) नाही.. अशी काही विसंवादी
उदाहरणे आहेत.... तरी पण आपण सकारात्मक भूमिका ठेवावी.
जगभर  कित्येक  विद्यापीठांतून व  संस्थांतून हिंदी  शिकण्याची
उत्सुकता व सोय असते.... जगाचे ध्यान मराठीकडे कमी आहे.
हिंदीला बरीच समांतर मराठी वाक्यरचना असते.... उदाहरणार्थ,
सुभाषचंद्र बोस म्हणायचे > तुम (तुम्ही) मुझे (मला) खून (रक्त) 
दो (द्या), मै (मी) तुम्हे (तुम्हाला) आजादी (स्वातंत्र्य) दूंगा (देईन). 
एक सामान्य वाक्य >> बीचमे (मध्ये) मत (नको) बोलो (बोलू).
गाणे भाग > आएगा (येईल) आनेवाला (येणारा) आएगा (येईल).
वरील वाक्यात हिंदी शब्दाचा मराठी अर्थ कंसात आहे... लेखन
करताना मराठी पद्धतीची देवनागरी आहे... हिंदी पद्धतही चालेल.
अशी शेकडो नमुना वाक्ये  पेपरातून पसरली, वेबवर ठेवली, तर
देश, जग मराठीत रस सहज घेईल. शब्दास शब्द मिळेल अशी
वाक्ये हवीत... रसनिर्मिती झाल्यावर भाषेचे बारकावे सांगावेत.
=========================================
 
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20110601/b461199e/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list