Marathi March 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Fri Mar 1 08:06:45 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu












































===============================
Marathi March 2013.................  Circulate.
Nonperiodic Marathi mail [monthly till June
2012] in Devanagari script [part in Roman].
(www.mngogate.com) visit biodata, various
articles, [M22 E03 E15 Marathi in Roman]
M22 link > (www.mngogate.com/m22.pdf). 
Topic here. Direct, indirect word meanings. 
............................. 1 ............................
ऐकव तव मधु बोल, कोकिळे
ऐकव तव मधु बोल.
एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल.
वसंत नाही अजूनि संपला
का झालीस अबोल ?
 
- माधव जुलियन (1894-1939) कविताभाग
.
aikava tava madhu bola, kokil'e
aikava tava madhu bola.
eka tuzaa svara aarta kharokhara
vaat'e maj'a binamola.
vasanta naahi aj'uni sampalaa
kaa zaalisa abola ?
 
- maadhav julian (1894-1939) kavitaabhaag.
.
उच्चार उदाहरणे. (गद्य) एक्‌ बोल्‌ स्वर्‌ ek, bol
svar.. (पद्य) एक बोल स्वर eka, bola, svara.
............................. 2 .............................
कोकिळ (नर) गातो. कोकिळा (मादी) गात नाही.
तरीही कवितेत व नित्य भाषेत कोकिळा गाते
असे उल्लेख येतात. ही विज्ञानकविता नाही. ही
रसिककविता आहे. बैल, गाय असे वेगळे शब्द
नित्य भाषेत आहेत... कावळा कावळी इत्यादी
वेगळे, बिनचुक  निर्देश नित्य भाषेत नसतात.
मधु मधुर, कडू हे अनुभव जिभेचे आहेत. पण
गायन, श्रवण यांबाबतीत हे शब्द सहज येतात.
हवामान बदलले. पूर्वी महाराष्ट्रात सप्टेंबरनंतर
पाऊस पडत नसे, आता पडतो... वसंतऋतुही
बदलला.. कोकिळ मानवी कॅलेंडर पहात नाही.
............................. 3 ............................
विदेशात स्त्रीवादी (फेमिनिस्ट) आंदोलन झाले
तेव्हा शब्दांवरील पुरुषी वर्चस्व नको, असाही
विचार आला. सर्व पुरुषांसाठी (मिस्टर) शब्द
आहे. विवाहस्थितीदर्शक शब्द (Miss, Mrs) 
महिलानी उडवले.. (Ms) समान शब्द आला.
चेअरमन साठी  चेअरपर्सन शब्द आला. पण
देशप्रमुख राणी असताना युनायटेड किंगडम
ऐवजी युनायटेड क्वीनडम  बदल होत नाही.
मराठी > अभ्यासिका (स्त्रीअभ्यासक नाही) = 
अभ्यासकक्ष.. वाचक, अभ्यासक उभयलिंगी.
अध्यक्ष- अध्यक्षा, संपादक - संपादिका, असे
काही लिंगदर्शक शब्द आहेत. परंतु राष्ट्रपती,
राज्यपाल, मंत्री, आमदार, डॉक्टर, अभियंता
अशा विविध  पदांवर महिला आल्या. म्हणून
अध्यक्ष, अध्यक्षा यांसाठी अध्यक्ष हा समान
शब्द  आता बहुधा वापरतात. कायदे, नियम 
यांमध्ये ( गुन्हा करणारा) शब्द असले तरीही
(गुन्हा करणारी) अंतर्भूत असते. (फुले आणि
फळे तोडल्यास  काही दंड होईल) हा कायदा
असला तर (फक्त फुले तोडली) असा बचाव
मानला जात नाही.  (आणि) = (किंवा) असा
भावार्थ (कायदा हेतु) न्यायदानात मानतात.
मूर्खास (शहाणा आहेस) चेष्टेने म्हटले जाते.
.........................  4 .........................
महाराज = धनाढ्य सत्ताधारी. अन्य अर्थ =
मराठी विरक्त संत... उदा. तुकाराममहाराज.
(सावधान. काही महाराज बनावट)..कित्येक
इंग्रजी वृत्तपत्रात 14/8/1947 पर्यंत मिस्टर
एम. के. गांधी > 15 पासून महात्मा गांधी !
=============================

-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20130301/966ec8ab/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list