Marathi September 2013
Madhukar Gogate
mng1932 at YAHOO.COM
Sun Sep 1 07:08:43 UTC 2013
VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
(Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu
==========================
Marathi September 2013.. Circulate.
Nonperiodic Marathi mail from 2000
in Devanagari script (part in Roman,
sample at start) Visit M22 E15 E03
& biodata on [www.mngogate.com].
M22 (www.mngogate.com/m22.pdf).
Topic here.. 2 languages compared.
........................ 1 .......................
प्रत्येक मानवी योजनेत काही गुणदोष
असतात = prattek maanavi yojanet
kaahi gun'adosh astaat. (पहा M22)
मराठी, इंग्रजी 2 भाषा थोडी तुलना पुढे.
....................... 2 ........................
मराठी (+ देवनागरी लिपी) साधारणपणे
ध्वनीदर्शक लिहिली जाते. काही अपवाद
आहेत. उदा. (प्रत्येक, दोष) यांचे उच्चार
(प्रत्तेक् दोश् ) आहेत. इंग्रजी (+ रोमन
लिपी, फक्त 26 अक्षरे). (go, spin) हे
ठीक. परंतु कित्येक शब्दस्पेलिंगे बेछूट.
उदा. राईट् = rite, write, right, wright.
....................... 3 ........................
इंग्रजीत absurd स्पेलिंगे कशी आली,
ती चर्चा येथे नको. त्यांचा वापर करोडो
लोक करोडो प्रकाशनात बघतात. त्यात
सुधारणा कठीण आहे. शिक्षण माध्यम
( इंग्रजी की मराठी) ही चर्चा येथे नाही.
इतर काही मुद्दे, निरीक्षणे येथे आहेत.
....................... 4 ...................
लिंग, हुद्दा कसेही असो. इंग्रजी विशेषण,
क्रियापद > समतायुक्त. he/she went.
बालक व मोठा नेता उल्लेख you, he.
(बर्फ फळा), (वाफ फळी), (पाणी फळ)
शब्द अनुक्रमे (पु) (स्त्री) (नपु) लिंगी व
क्रियापदे (गेला, गेली, गेले) बदलणारी.
इंग्रजी विशेषणे उदा. (ब्लु, हॉट) सर्वच
बिनलिंगी.. मराठीत तशी काही आहेत.
उदा. (लाल, गरम).. पण (निळा, निळी,
निळे) वगैरे कित्येक तीनलिंगी शब्द.
याबाबत मराठीहून इंग्रजी सोपी आहे.
....................... 5 ......................
देवनागरी सुपरिचित आहे. च, ज, झ
खाली ठिपका ( नुक्ता) ध्वनीभेदाला
हवा. (तूर्त सुधारणा नको). देवनागरी
मराठीला ठीक आहे.... गरज भासली
तर रोमन लिपी वापरा. a अ, aa आ,
t त् t' ट् , j j’ < ज् दोन ध्वनी, वगैरे
तरतूदी आहेत. ट् = t खाली नुक्ता,
अशी नवचिन्हे नाहीत. इंग्रजीची सर्व
यंत्रे मराठीसेवेला ! थिएटरात रांगा व
शेअरमार्केटभाव यादीला abc सोयीची.
देशभर फोन-बुके व यंत्र-लेबले इंग्रजी.
कायदा कलमे (2 क, 2 ख, 2 ग ...)
ऐवजी (2 ए, 2 बी, 2 सी ...) लिहावे.
कायदे, करारांचे भाषांतराला ते ठीक.
जगात खूप भाषा, लिपी आहेत. पण
सर्वत्र रसायनसूत्रे, समीकरणे, यात.
Aa - Zz अक्षरे, जागतिक अंक 0 - 9.
उदा. Au गोल्ड Ca कॅल्शम Zn झिंक.
जगभर a -- z सुशिक्षितांना परिचित.
ए बी सी...< फ्रेंच वगैरेत वेगळी नावे.
...................... 6 .....................
जर्मनी, जपान, चीन, रशिया, वगैरे
एकभाषक देश आहेत. तेथील सर्व
व्यवहार स्थानिक भाषेतच होतात.
भारत बहुभाषक, बहुलिपी देश आहे.
कंपन्यांनी भागधारकांस लाभांशपत्रे
कोणत्या भाषेत पाठवायची ? रिझर्व
बॅन्केने देशातील बॅन्कांना कोणत्या
भाषेत धोरण सांगावे ? प्रकल्प चर्चा
भारतातील विविध भाषकानी एकत्र
कशी करावी ? अशा अनेक प्रश्नांचे
उत्तर इंग्रजी हेच आहे... जागतिक
पातळीवर इंग्रजी संपर्कभाषा आहे.
जगभर विद्यापीठे > वेबसाईट पहा.
माहिती स्थानिक भाषेत व इंग्रजीत.
I I T व राष्ट्रीय संस्थाकार्य इंग्रजीत.
ज्ञानविज्ञान अतिवेगाने वाढत आहे.
सर्व ज्ञान मराठीत येईल असे नाही.
उच्च व्यवसायास इंग्रजी आवश्यक.
(मराठी, इंग्रजी) व्यवस्थित शिकावी.
..................... 7 ...................
इंग्रजी समजण्यास पूरक मजकूर
देवनागरीत देता येईल.... उदाहरण
my son went to town (माय् सन्
वेंट् टु टाउन्) माझा मुलगा गावाला
गेला. to town > मराठी town to
(गाव > गावा) + (ला) सांगता येईल.
गाव > गावाला, गावाने, गावात इ.
बरेच प्रत्यययुक्त शब्द (असे खूप
नामांसाठी) कोश, स्पेलचेकर साठी
मोठा भार.. इंग्रजीत from, to, in,
by वगैरे prepositions सोयीस्कर.
देवनागरी त्रिस्तरी, जोडाक्षरे सहित.
रोमन एकस्तरी व जोडाक्षरे नाहीत,
अधिक सुलभ. उदा. सूर्य soorya.
देवनागरी शिरोरेषेमुळे शब्द स्पष्ट.
..................... 8 ...................
मल्याळम तज्ञ सांगतात > भरपूर
इंग्रजी शब्द मल्याळम लिपीमध्ये.
(वीज देयक) < मराठी... मल्याळम
लिपीत चक्क > इलेक्ट्रिसिटी बिल.
त्यांनी इंग्रजी परिभाषा पूर्ण घेतली.
हे मराठीत करावे ? generator =
जनित्र ऐवजी जनरेटर ? पहा आज
हजारो इंग्रजी शब्द मराठीत.. उदा.
सोडा, कॉफी, सिनेमा, गॅस सिलिंडर
पेट्रोल, स्कूटर, चॉकलेट, नर्स, फोन.
................. लिंक पहा ...........
(www.mngogate.com/e01.htm)
(www.mngogate.com/e09.htm)
(www.mngogate.com/e14.htm)
सोपी मराठी मुद्दा 11 पहा लिंक >
(www.mngogate.com/e03.htm)
=======================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20130901/510da8c4/attachment.htm>
More information about the Vyakaran
mailing list