Marathi June 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Sat Jun 1 08:07:13 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors:  Tej K. Bhatia, Syracuse University, New York
          John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details:  Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
          SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
          (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

=============================
Marathi June 2013 ............... Circulate.
Nonperiodic Marathi mail since yr 2000
part in Devanagari, part in Roman script
sample here at start see M22 E15 E03
& biodata (http://www.mngogate.com/).
M22 >> (www.mngogate.com/m22.pdf) 
Topic here.. Tact to develop a language.
........................... 1 ...........................
शक्तियुक्ति एकवटूनि कार्य साधिती.
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा.
shaktiyukti ekavat'uni kaarya saadhiti.
pasare yatkirti ashi vismayaavahaa.
........................... 2 ........................
बहु असोत सुंदर संपन्न की महा.. प्रिय
अमुचा एक महाराष्ट्र देश हा <<< आरंभ
असलेल्या महाराष्ट्रगीतात  उपरोक्त ओळी.
मराठीतून ह्रस्वदीर्घभेद काढण्यास युक्ति > 
(i = इ ई, u = उ ऊ) घ्या. हिंदी, लिपी हे
शब्द  hindee, lipee  ऐवजी hindi, lipi
असे सहजपणे लिहिले व वाचले जातात.
संदर्भाने kar कर = Do Tax Hand तसे
संदर्भाने sut =  सुत (पुत्र),  सूत (धागा). 
रोमन लिपीत हे जमते. तसे देवनागरीत
सुचवले नाही, कारण जगभर लाखो लोक
ह्रस्वदीर्घयुक्त  व्याकरण, विविध प्रकाशने 
जाणतात.. मराठीत शेकडो इंग्रजी शब्द.
पण प्रमाणलेखन अजून ठरलेले नाही.
क्लोरिन ? क्लोरीन ?  ट्युब ? ट्यूब ?
वगैरे... रोमनमध्ये klorin, t'yub घ्यावे.
.......................... 3 .......................
संविधानाने  रोमनलिपीत  इंग्रजी  देशाची
संपर्क भाषा मानली आहे... गरज पडली
तर रोमन यंत्रे  मराठीकरिता  वापरावीत.
रोमनलिपी  पुरेशी  ध्वनीनिष्ठ  केली आहे.
(a = अ, aa = आ, d = द्‌ , d' = ड्‍) वगैरे
घेणे, (A = आ, D = ड्‍ ) वगैरे न घेणे ही 
युक्ति !  प्रचलित इंग्रजी  स्पेलिंग गरजेचे
असल्यास आद्याक्षर A-Z कॅपिटल लिहावे.
उदा. Cement = siment'. नाव Seema
चालेल पण simaa = (हद्द). (.) ऐवजी 3
टिंबे (...)  हे विरामचिन्ह 2 वाक्यांमध्ये.
.......................... 4 .......................
इंग्रजी  माध्यमात  वा मराठी माध्यमात
विद्यार्थी शिक्षण  घेतात... सर्वांना  दोन्ही
भाषांत रस  वाटावा, एकोपा यावा  म्हणून 
एक युक्ति. काही सुगम वाक्यसंग्रह करा
व प्रसार करा... एक नमुना वाक्य पुढे.
(a) Hydrogen is a colourless gas.
(b) हायड्रोजन इज ए कलरलेस गॅस.
(c) हायड्रोजन एक रंगहीन वायू आहे.
(d) haayd'rojan ek rangahin vaayu
aahe. = (c) मराठी रोमन लिपीत. 
इंग्रजी (a) चे देवनागरी रुपांतर = (b)
इंग्रजी (a) =  मराठी अर्थ (c)
......................... 5 .....................
गेल्या सुमारे 80  वर्षात कवि, कवी ?
अंत्यस्वर ह्रस्व, दीर्घ ?  प्रमाणलेखन
नियम उलटसुलट अनेकदा बदलले !
छंदकवितेत जोडाक्षरपूर्व ह्रस्व = दीर्घ.
अग्नि aign चिन्हक्रम. अग्नी < ठीक.
मोडी लिपीमध्ये ह्रस्वदीर्घभेद नाहीत.
(दिन दीन) (सुत सूत) इ. अर्थभेदाच्या
जोड्या थोड्या आहेत. (सामान) मध्ये
पहिला आ उच्चारात ह्रस्व, दुसरा आ
उच्चारात दीर्घ आहे. पण लेखनात ती
नोंद नसते. सर्व स्वर उच्चारात ह्रस्व,
दीर्घ होऊ शकतात. इ ई, उ ऊ हे भेद
आल्याने व्याकरण क्लिष्ट झाले आहे.
युक्ति > लोकांना सांगावे की मुंबई ते
दिल्ली  या  रेल्वेमार्गात  अनेक गावे
आहेत. या गावात विमान येत नाही.
तसे देवनागरीत ह्रस्वदीर्घभेद आहेत.
रोमन लिपीमध्ये ते नाहीत... पाहिजे
तर ह्रस्वदीर्घासाठी i u पुढे ( ’ ) चिन्ह.
(सर्कार्‌ ) उच्चार.. देवनागरी (सरकार)
शब्द विसंगत. रोमन (sarkaar) ठीक.
देवनागरीत इतरही  विसंगती आहेत.
पण येथे फक्त ह्रस्वदीर्घभेद विचारार्थ.
========================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20130601/b6c07929/attachment.htm>


More information about the Vyakaran mailing list