Marathi May 2013

Madhukar Gogate mng1932 at YAHOO.COM
Wed May 1 18:59:32 UTC 2013


VYAKARAN: South Asian Languages and Linguistics Net
Editors: Tej K. Bhatia, Syracuse University, New York
     John Peterson, University of Osnabrueck, Germany
Details: Send email to listserv at listserv.syr.edu and say: INFO VYAKARAN
Subscribe:Send email to listserv at listserv.syr.edu and say:
     SUBSCRIBE VYAKARAN FIRST_NAME LAST_NAME
     (Substitute your real name for first_name last_name)
Archives: http://listserv.syr.edu

=============================
Marathi May 2013.................. Circulate.
nonperiodic Marathi mail monthly till june
2012 in Devanagari script, part in Roman.
website [www.mngogate.com] > biodata,
Visit articles, links, and samples at end.
Topic here.........Try to become bilingual.
.......................... 1 ............................
ब्रिटन, अमेरिका  हे  देश  इंग्रजीभाषक आहेत. 
चीन, जपान, जर्मनी इत्यादी देश एकभाषक.
त्यांना इंग्रजीची गरज नसते. पण भारत देश
बहुभाषी, बहुलिपी  असल्यामुळे उच्च शिक्षण
व व्यवसाय यात  इंग्रजी प्रभावी आहे.. मोठे
प्रकल्प   (पूल,  कारखाने,  चंद्रयान, मेट्रोरेल्वे,
मेंदुसंशोधन, उंच इमारती, इ.) याकरिता एक 
भाषा हवी..  इंग्रजी सर्व भारतीयांना समान
कठीण व समान सोपी  आहे.  सर्व जगाची 
ती संपर्कभाषा आहे..... तिच्यात  आधुनिक
ज्ञान, विज्ञानाचा  प्रचंड खजिना (छापील व
इलेक्ट्रॉनिक... जगामधील 80 % वेबसाईट).
मुख्य   म्हणजे  ती गुलामगिरी भाषा नाही.
स्वतंत्र भारताने तिचा सादर स्वीकार केला
आहे.  संविधान अनुवादात तफावत असली
तर इंग्रजीतील संविधान मान्य केले जाते.
सर्वोच्च व उच्च न्यायालयात फक्त इंग्रजी
वापरली जाते..... कायद्याने सर्व वाहनांच्या
नंबरप्लेट इंग्रजीत असतात.... ते योग्यही
आहे.... अपघात, चोरी झाल्यास पोलीसांना
त्वरित गाडीमालक समजू शकतो. आणखी
एक गोष्ट.. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य
दिले  आहे. मुंबई पुणे येथे 95% बिल्डर व
ग्राहक करार इंग्रजीत होतात... यंत्रे, औषधे
यावर इंग्रजी लेबले असतात. माल अमुक
राज्यातच जाईल, हे उत्पादक ठरवू शकत
नाही. महाराष्ट्रातील NCL, IIT वगैरे मोठ्या
संस्था इंग्रजीत कामे करतात..  कंपन्यांना 
स्टॉक मार्केट, लाभांश, कॅटलॉग,  टॅक्सेशन,
इत्यादीसाठी इंग्रजी लागते. आयातनिर्यात,
विशेषता संगणकी  इंटरनेट, कामे इंग्रजीत.
चांगल्या जॉबसाठी इंग्रजी ज्ञान आवश्यक.
........................ 2 .......................... 
मातृभाषेत शिक्षण हे  सुलभ व संस्कृतीस
पोषक... लहान  व्यवसायांस इंग्रजी लागत
नाही, पण ती थोडीतरी शिकावी.. कोणत्या
वयापासून, कोणत्या विषयांसाठी  घ्यावी हे
शिक्षणक्ष्रेत्रातले प्रश्न आहेत. त्यांबाबत वाद
शक्य आहेत. पण एक सामाजिक परिणाम
नोंदला पाहिजे.... सर्व भारतीय भाषांमध्ये
कित्येक  आधुनिक   तंत्रज्ञानाच्या वस्तु  व 
सेवा  इंग्रजीची  नावे  धारण करतात... उदा.
सोडा,  कॉफी, प्रेशर कुकर, टायर,  सायकल,
स्कूटर, गॅस  सिलिंडर, आइस्क्रीम, मोबाईल,
प्लास्टिक, पेट्रोल पंप,  पेन,  रेनकोट, मोटर,
स्टेनलेस  स्टील, पंक्चर, टूथपेस्ट, इंजेक्शन,
रेडियो, सिमेंट, लॉकर,  सिनेमा, फोन, बॅटरी,
कीबोर्ड,  पेपर,  कॅमेरा, रिमोट, मीटर, केबल.
करोडो भारतीयांस  हे  कित्येक समान शब्द
परिचित आहेत. हे  ऐक्यासाठी पोषक आहे.
पुस्तकात  तेथील  लिपीत  शब्दलेखन होते.
.......................... 3 .........................
यूनिकोड  तंत्रज्ञानाने   भारतीय भाषा  आणि
लिपी यात मुद्रण, ई-संदेशवहन सुकर झाले.
आणखी   संशोधन  होऊन   विविध  भाषांतरे
अचूक व त्वरित होऊ लागली तर ते हवेच
आहे. तरीपण इंग्रजीकडे दुर्लक्ष नको. इंग्रजी
स्पेलिंगे अनियमित, उलट देवनागरी बरीच
ध्वनिदर्शक.. व्याकरण बाजूस ठेवून निदान
इंग्रजी नामे (Nouns)  स्पेलिंग, देवनागरीत
उच्चार,   मराठी अर्थ,  वगैरे संग्रह  करावेत.
उदा. Sister = (सिस्टर) = बहीण... फुलाची 
माहिती देताना केवळ  पुंकेसर व  स्त्रीकेसर
असे उल्लेख नकोत.  इंग्रजी नावेही द्यावीत.
एखादा   जिज्ञासू  त्यामुळे  इंग्रजी वेबसाईट
हुडकू   शकेल... (दूरध्वनी, भ्रमणभाष) वगैरे
(फोन, मोबाईल)  लिहावेत ? विचार करावा.
........................... 4 ...........................
वेबसाईट लेख पहा  vebsaait' lekh pahaa
E14  > (www.mngogate.com/e14.htm) 
E01 >  (www.mngogate.com/e01.htm) 
M09  > (www.mngogate.com/m09.pdf)
रोमन लिपी योजना. roman lipi yojanaa. 
E15  > (www.mngogate.com/e15.htm) 
M22  > (www.mngogate.com/m22.pdf) 
E03  > (www.mngogate.com/e03.htm)
-------------------------- xxx------------------------
वरील मजकूर 30 एप्रिल तयार, 2 मे पासून
प्रेषण..[समाज, भाषा आणि तंत्रज्ञान] यावर
डॉ विजय भटकर,  डॉ प्रमोद तलगेरी यांनी 
[पुणे 1 मे 2013] जाहीर चर्चा केली. संपर्क
.. [www.marathiabhyasparishad.com]..
=============================
-------------- next part --------------
An HTML attachment was scrubbed...
URL: <http://listserv.linguistlist.org/pipermail/vyakaran/attachments/20130501/73b9ea9c/attachment.html>


More information about the Vyakaran mailing list